लेणी बघायची म्हंटलं की कुठेतरी डोंगरावर घाम गाळात जायचं आणि मग
तिथलं ते शेकडो वर्ष जुनं कोरीवकाम बघून तृप्त व्हायचं हे नेहमी लेणी बघतांना
येणारा अनुभव आहे पण अगदी भर शहरी वस्तीत ही लेणी असू शकतात आणि असं एक लेण
पुण्यात अगदी भरवस्तीत आहे. जंगली महाराज रोड वर , जंगली महाराज समाधीच्या शेजारी
पाताळेश्वर हे हिंदू गुफा मंदिर आहे आणि ह्या लेण्यात शंकराच पुरातन मंदिर आहे.
साधारण ८ व्या शतकात राष्टकुट काळात खोदलेल हे मंदिर आता पुरातत्व खात्याच्या
अखत्यारीत येतं. अर्थात ते पूर्वी शहराच्या बाहेर होतं पण शहराच्या वाढत्या वेशीने
ह्या मंदिराला अगदी भरवस्तीत आणून ठेवलाय. सुदैवाने हा परिसर हिरवागार आहे.
ह्या मंदिराचं आणखी एक वेगळेपण म्हणजे हे मंदिर जमीन खोदत खाली बनवलेलं आहे. कदाचित म्हणूनच ह्याला पाताळेश्वर नाव पडलं असावं. ज्वालामुखी ने तयार झालेल्या टणक खडकात वरपासून खाली खोदत जात नंदी मंडप आणि मग आडवं खोदत हे गुफा मंदिर बनवलेलं आहे जस वेरुळचे कैलास लेण ही अश्याच पद्धतीने बनवलं आहे.
जंगली महाराज समाधीला नमस्कार करून डावीकडे पाताळेश्वर मंदिर आहे.
काही दगडी पायऱ्या उतरून मंदिरात जावं लागतं पण ह्या पायऱ्या उतरण्या आधीच आपलं
लक्ष वेधून घेतो तो मंदिरा समोरील भव्य गोलाकार दगडी नदीमंडप. हा भव्य मंडप १६
खांबांवर उभा आहे.
मंडपात नदीची कोरीव दगडी मूर्ती, ह्या नदीच्या गळ्यात माळा,
घंटा वगैरे कोरलेल्या आहे. एकंदरीतच नंदीमंडप म्हणजे खास नदीसाठी मंडप मी पहिल्यांदा
बघितला. हा मंडप अतिशय दणकट आहे पण ह्यात फारस सुबक कोरीव वगैरे नाही. तरी ही हा
नदीमंडप कायम लक्षात राहावा असाच आहे हे नक्की जाणकारांच्या मते ही अपूर्ण लेणी
आहेत त्याच्या मागचं बरोबर कारण ज्ञात नाही पण कदाचित परकीय आक्रमणाचा धोका असावा
किंवा आणखी काही
डावीकडे मागच्या बाजूस एक आणखी नंदी ची मूर्ती ठेवलेली आहे पण तिचा
तसा काही संदर्भ लागलं नाही. ह्या नंदीच्या रेषेत मंदिराच्या दिशेने गेलो की
बाजूला एक ओसरी आहे. दोन खांबावर उभी ही लहानशी ओसरी आणि त्याच्या समोर एक लहानसं
पाण्याचं टाक. एक वडाच झाड ओसरीपुढे आहे जिथे वटपोर्णिमेला गर्दी होते
मंदिरात प्रेवेश केला की त्याची भव्यता लक्ष्यात येते. एकूण चोवीस खांबांवर उभ्या ह्या मंदिरात
पाताळेश्वरची प्रतिष्ठापना केलेली आहे. मूळ गाभाऱ्या बाजूला दोन आणखी खोल्या आहेत.
बाजूला राम लक्ष्मण सीता ह्यांची सुंदर मूर्ती ही आहे. अर्थात ती संगमरवरी मूर्ती
ही पुरातन नाही पण सुबक नक्कीच आहे. मंदिराच्या मागच्या उजव्या भागात उंचवटा आणि
काही पायऱ्या आहेत. बहुदा ध्यानधरणे साठी एकांत लाभावा म्हणून ही सोय असावी.
मंदिराच्या भिंतींवर मोठी शिल्प कोराल्याच्या खुणा आहेत पण ती शिल्प आता ओळखण्या
पलीकडे गेलेली आहेत. ही लेणी ब्राम्हणी पद्धतीची मानली जातात त्यामुळे बौद्ध
लेण्याप्रमाणे विहार दिसत नाही. हे प्रार्थना मंदिर आहे.
मंदिराच्या प्रेवेश्याच्या उजव्या खांबावर देवनागरी भाषेतील शिलालेख आहे पण तो
ही कालानुमानाने झालेल्या दगडाच्या झिजे मुळे वाचता येत नाही, फक्त काही अक्षर
समजतात. मंदिराच्या बाहेर, नदी मंडपाच्या उजवीकडे दगडी पायऱ्यांची विहीर देखेल आहे
पण सध्या ती विहीर वरती जाळी टाकून बंद केलेली आहे
ह्या मंदिराचा पुसटसा उल्लेख काही पेशवे दप्तरात आढळतो आणि श्रीमंत
बाजीराव पेशव्यांनी ह्या मंदिराचा जिर्णोधार ही केल्याचं समजत. इंटरनेट वर अधिक
माहिती शोधली तर ह्या लेण्यांना काही मान्यवर परदेशी इतिहास तज्ञ आणि मोठ्या
चित्रकारांनी खास भेट दिली आहे हे ही समजतं
मंदिरा च्या आजूबाजूला सुंदर बगीचा बनवलेला आहे आणि मंदिरातील
स्वच्छता बघून खरच प्रसन्न वाटत. ह्या बगिच्या मध्ये एक पुरातन पिंपळाचा वृक्ष आहे
त्याच्या पारंब्यांनी आपले पाय जमिनीत रोवून मूळ खोड कित्येक पटीने मोठं केलं आहे
ही लेणी सकाळी ८:०० ते संध्याकाळी ५:३० पर्यंत दर्शनासाठी उघडी असतात.
हे राबत मंदिर आहे जिथे आजही पाताळेश्वराची पूजाअर्चा नियमितपणे होते आणि
सणासुदीला भाविकांची दर्शनासाठी रांग लागते. संभाजी नगर रेल्वे स्टेशन पासून अगदी चालत जायच्या अंतरावर हे गुफा मंदिर आहे