भाजाची लेणी ही पुरातन व्यापारी मार्गावर
वसवलेली सुंदर लेणी आहे. पूर्वी अरबी सागरातून आलेला माल / समान दक्खन पठारावर
आणण्याच्या मार्गावर वसवलेली भाजा प्रमाणेच बडसे, कार्ला ही लेणी सुद्धा जवळच
आहेत. बडसे लेणं तर भाजा लेण्याच्या डोंगर रांगेतच आहे आणि कार्ला हे साधारण ५
किलोमीटर उत्तरेकडे आहे. ह्या लेण्यांसोबत लोहगड आणि विशालगड हे दोन किल्ले ही
ह्याच भागात आहेत ह्यावरून पूर्वी हा मार्ग हा एक प्रमुख व्यापारी मार्ग होता हे
सहज समजून येतं. जेथे व्यापारी
मार्ग होते, तिथे तिथे लेणी, विहार
खोदले जायचे. .घाटमाथा व कोकण ही सह्याद्री ची दोन रूपं, आणि त्यांना जोडणारे जे
काही घाटमार्ग आहेत उदा. कसारा, मालशेज, बोरघाट
किंवा खंडाळा घाट, ताम्हाणी, वरंध, आंबेनळी, आंबाघाट, फोंडाघाट
ह्या घाट चढताना वाटेत इतरत्र आपणास लेणी खोदलेली आढळतील. भाजाची लेणी भारतीय
पुरातत्व खात्याच्या अधिकार क्षेत्रात येतात
ही लेणी इसवीसन
पूर्व २ शतकातील आहेत पुढे ही साधारण ८ शतकं ह्या लेण्यां मध्ये भर पडत राहीली आणि
लेणी विस्तारत गेली. इतकी पुरातन लेणी आणि त्याकाळी केलेले ते कोरीवकाम बघून मती
गुंग होवून जाते. ही लेणी हीनयान पद्धतीची असून त्यात एकूण २२ लेणी कोरली आहेत,
त्यातील एक चैत्यगृह असून बाकी एकवीस विहार आहेत.
भारतातील हे सर्वात जुने
चैत्यगृह आज २२०० पेक्षाही अधिक जुनं असूनही खूपच चांगल्या परिस्थितीत बघायला
मिळतं. चैत्यगृह हे प्रमुख लेण म्हणता येईल हे सत्तावीस अष्टकोनी खांबांवर तोललेलं
आहे आणि ह्या खांबांवर कमळ, चक्र ही चिन्हे कोरलेली दिसतात. साधारण आठ उपलब्ध
शिलेलेखापैकी एका पाण्याच्या टाक्यात असलेल्या लेखात दान करणाऱ्याच नाव “महारथी
कोशिकीपुत विह्नुदत” असं सापडतं. ह्या चैत्यागृहात प्रमुख स्तूप आहे. जसा इतर
लेण्यांच्या चैत्यागृहात आढळतो. चैत्यागृहाला लाकडी तुळयांचे छत बनवलेलं आहे आणि
ही लाकडं सुद्धा २२०० वर्ष जुनी असून ही अजून शाबूत आहेत. हे खरोकर आश्चर्य
म्हणावं लागेल ह्या लाकडात ही ब्राम्ही लिपीमध्ये काही लेख आहेत. आज चैत्यगृह हे
उघड आहे पण पूर्वी दगडातील भोकं दर्शवतात की चैत्यागृहाला लाकडी दरवाजा असावा.
ह्या लेण्यांमध्ये १४ स्तुपाचा एक समूह ही
बघायला मिळतो. ह्यातील ५ स्तूप लेण्याच्या आत तर ९ स्तूप बाहेर अशी रचना आहे. ह्या
स्तूपात तिथे राहणाऱ्या भिक्षुं चे अवशेष आहेत. स्तुपावर अम्पानिका, धम्मागिरी आणि
संघदिना अशी भिक्षूंची नावं सुद्धा दिसतात. दोन स्तुपावर अवशेष ठेवण्यासाठी कोरीव
दगडी खोके ही दिसतात
सूर्य लेणी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लेण्यामध्ये
सूर्यदेव रथावर स्वर होऊन दानवांना तुडवत जातांनाचा देखावा आहे तर एका ठिकाणी इंद्र
देवा हत्तीवर आरूढ झालेले दिसतात
खोलीच्या दरवाज्यावर अप्रतिम शस्त्रधारी द्वारपाल
दिसतात. व्हरांडा मग एक दालन आणि त्याला आत आणि काही खोल्या अशी ह्या विहाराची
मांडणी आहे पण ह्यातील नक्षीकाम फारच सुंदर आहे. एका शिल्पामध्ये नृत्य वाद्य
कार्यक्रमाचं दृशा आहे आणि त्यात तबला हे वाद्य दिसतं आहे. तबला वाद्य इतके जुने
असल्याचा हा एका ठळक पुरावाच आहे
असे हे भारतातील प्रथम बौद्ध चैत्यगृह,
२२०० वर्ष जुन्या लाकडाच्या तुळया आणि अप्रतिम कोरीवकाम, तबला वाद्याचा अधिकृत पुरातन पुरावा आपल्या महाराष्ट्रात आहे. आणि भारतीय पुरातन खाते ह्याची देखभाल करत आहे.
अगदी मामुली ५ रुपये प्रवेश शुल्क आहे.
पावसाळ्यात ह्या लेण्यांचा खाली एक मस्त धबधबा कोसळतो आणि मग पावसाळी सहली ला जाणाऱ्यांची तोबा गर्दी होते. गाडी पार्किंग साठी ग्रामपंचायत २० रुपये चार्ज घेते. नक्की खास जाऊन बघावं असं हे लेण. मालवली रेल्वे स्टेशना पासूनचा मार्ग गुगल नकाश्यात दाखवला आहे
No comments:
Post a Comment